या बहिणींना 1500 रुपये मिळणार नाहीत तात्काळ यादी जाहीर! Ladki Bahin Yojana Yadi

या बहिणींना 1500 रुपये मिळणार नाहीत तात्काळ यादी जाहीर! Ladki Bahin Yojana Yadi

Ladki Bahin Yojana Yadi महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहीण योजना’त सध्या महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. योजनेअंतर्गत काही अपात्र महिलांना वगळण्याची प्रक्रिया सुरू असून, अनेक महिलांचे हप्ते बंद होण्याची शक्यता आहे. पात्र असूनही जर तुमचा लाभ थांबला असेल, तर तुम्ही काय करु शकता, याची संपूर्ण माहिती येथे दिली आहे.

अपात्र ठरण्याची प्रमुख कारणे

या योजनेत अपात्र ठरणाऱ्या महिलांमध्ये काही प्रमुख कारणे आहेत. काही महिलांनी कुटुंबाकडे चारचाकी वाहन असल्यास किंवा वार्षिक उत्पन्न ₹२.५ लाखांपेक्षा जास्त असल्यासही चुकीची माहिती सादर करून लाभ घेतला आहे. याशिवाय काही महिलांनी १८ वर्षांपेक्षा कमी वय असूनही आधार कार्डवरील जन्मतारीख बदलून १८ वर्षे पूर्ण झाल्याचे दाखवले आहे. काही कुटुंबांमधून दोनपेक्षा जास्त महिलांनी योजनेचा लाभ घेतल्याचेही आढळले आहे. अशा सर्व महिलांना योजनेतून वगळण्यात आले असून, ही पडताळणी प्रक्रिया अजूनही सुरू आहे. प्राप्तिकर विभागाने महिला व बालविकास विभागाला दिलेल्या माहितीच्या आधारे ऑगस्ट महिन्यापासून वार्षिक उत्पन्न ₹२.५ लाखांपेक्षा जास्त असलेल्या महिलांची पडताळणी केली जाईल.

अपात्र महिलांना ओळखण्यासाठी वापरले जाणारे शेरा

अपात्र महिलांना ओळखण्यासाठी काही विशिष्ट शेरा वापरला जातो. एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांचा लाभ बंद झाल्यास त्यांच्याजवळ ‘एफएससी मल्टिपल इन फॅमिली’ असे शेरा दाखवला जातो. ज्या कुटुंबांकडे चारचाकी वाहन आहे, त्यांच्यासाठी ‘आरटीओ रिजेक्टेड’ असा शेरा दिला जातो. तसेच इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांसाठी ‘अदर स्कीम बेनिफिशिअरी’ असा शेरा ठेवण्यात येतो.

लाभ थांबल्यास तक्रार कशी दाखल करावी?

जर तुम्ही पात्र असूनही लाभाचा हप्ता थांबला असेल, तर तुम्ही तक्रार दाखल करू शकता. ऑनलाइन तक्रारसाठी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर ‘ग्रिव्हन्स’ हा पर्याय उपलब्ध आहे. अर्जदार स्वतःचा लॉगिन आयडी तयार करून तक्रार सादर करू शकतात. त्याचबरोबर ऑफलाइन तक्रारसाठी तुम्ही महिला व बालविकास कार्यालय किंवा तालुक्यातील बालविकास प्रकल्प कार्यालयात अर्ज सादर करू शकता.

Disclaimer: हा लेख फक्त माहितीपूर्ण आहे. अधिकृत माहिती आणि अर्ज प्रक्रियेसाठी सदर योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित विभागाशी संपर्क साधावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top