Ladki Bahin August मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात आतापर्यंत १३ हप्त्यांची रक्कम जमा करण्यात आली आहे. दरमहा १५०० रुपये मिळणाऱ्या या योजनेतून लाखो महिलांना दिलासा मिळत आहे. मात्र, ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्याप न मिळाल्याने लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
योजना कधी सुरु झाली?
ही योजना महायुती सरकारने जुलै २०२४ मध्ये सुरु केली होती. सुरुवातीपासूनच महिन्याच्या अखेरीस महिलांच्या खात्यात पैसे जमा होत होते. पण काही महिन्यांपासून या तारखेत बदल दिसून येतो आहे. जुलै २०२५ चा हप्ता रक्षाबंधनाच्या आधीच मिळाला होता. त्यामुळे आता ऑगस्टमधील रक्कम कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेतलेला निर्णय
राज्य सरकारने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना पगार ५ दिवस आधी म्हणजेच २६ ऑगस्ट रोजी देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद, मान्यता प्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे, अकृषि विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांतील कर्मचारी तसेच निवृत्त व कुटुंब निवृत्त वेतनधारकांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.
योजनेतील अनियमितता व चौकशी
महिला व बालविकास विभागाच्या माहितीनुसार काही ठिकाणी एका कुटुंबातील तीन महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळले आहे. नियमांनुसार फक्त दोन महिलांना परवानगी असून अतिरिक्त नाव वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचबरोबर ग्रामविकास विभागाच्या सेवेत असलेल्या काही महिला कर्मचाऱ्यांनीही लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले असून त्याबाबत चौकशी सुरु आहे.
लाभार्थ्यांची उत्सुकता वाढली
या सर्व घडामोडींमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी जमा होईल याची प्रतीक्षा लागली आहे. महिलांचे लक्ष राज्य सरकारकडून जाहीर होणाऱ्या तारखेकडे लागले आहे.
Disclaimer: ही माहिती विविध वृत्तस्रोत व शासकीय कागदपत्रांवर आधारित असून लेख केवळ माहितीपर आहे. कोणत्याही शंका अथवा अधिकृत माहितीसाठी महिला व बालविकास विभाग किंवा संबंधित सरकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.