Namo Shetkari Yojana गेल्या काही दिवसांपासून शेतकरी बांधव ज्याची आतुरतेने वाट पाहत होते त्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याबाबत मोठे अपडेट समोर आले आहे. शेतकऱ्यांमध्ये या हप्त्याबाबत प्रश्न उपस्थित होत होते की तो कधी मिळणार आणि योजना बंद होणार का? यावर सरकारकडून दिलासादायक माहिती आली आहे.
सातवा हप्ता कधी मिळणार?
कृषी विभागाच्या माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर साधारणपणे नऊ ते दहा दिवसांनी नमो शेतकरी महासन्मान निधीचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. ही केवळ शक्यता असून अधिकृत घोषणा झाल्यावरच निश्चित तारीख कळेल. तरीदेखील, हा ₹2000 रुपयांचा हप्ता बैलपोळा सणाच्या आसपास जमा होईल अशी अपेक्षा आहे.
योजना बंद होणार का?
सध्या सोशल मीडियावर आणि बाजारात अफवा पसरत आहेत की ही योजना बंद होणार आहे. मात्र, विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशा अफवांमध्ये काहीही तथ्य नाही. ही योजना कायम राहणार असून पात्र शेतकऱ्यांना सातवा हप्ता नियमितपणे मिळणार आहे.
आर्थिक मदतीत बदल झाला आहे का?
शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या वार्षिक मदतीच्या रकमेमध्ये कोणताही बदल झालेला नाही. केंद्र सरकारकडून ₹6000 आणि राज्य सरकारकडून ₹6000 मिळून दरवर्षी शेतकऱ्यांना एकूण ₹12000 मिळणार आहेत. काही निधी कृषी समृद्धी योजनेसाठी वळवण्यात आला असला तरी वार्षिक मदत वाढलेली नाही.
कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ?
या सातव्या हप्त्यात राज्यातील जवळपास 96 लाख शेतकरी पात्र ठरणार आहेत. त्यात 4 लाख शेतकरी असे आहेत ज्यांना मागील थकीत हप्ते देखील मिळतील. या हप्त्यासाठी अंदाजे ₹1900 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.